आंबा मोहर संरक्षण | amba mohor sanrakshan

आंबा मोहर संरक्षण | amba mohor sanrakshan[matched_content]

▶️ व्हिडीओमध्ये दिलेली कृषी उत्पादने खरेदी करण्यासाठी आता खाली दिलेल्या 👇🏼 लिंकवर क्लिक करा आणि 🥳 100% कॅशबॅकसह उत्पादन घरपोच मिळवा! 📢 कॅश ऑन डिलिव्हरी सुविधादेखील उपलब्ध!

👉लिंक – https://krushidukan.bharatagri.com/

============================================================

👨‍🌾नमस्कार शेतकरी बांधवांनो! 🙏

🌱भारतअ‍ॅग्रीमध्ये आपले स्वागत आहे.

✅आजचा विषय – 🌱आंबा मोहर संरक्षण | amba mohor sanrakshan👍

आंब्याच्या झाडांना मोहोर फुटण्याची क्रिया साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यापासून सुरू होते आणि ती जानेवारी अखेरपर्यंत चालू राहते. क्वचित प्रसंगी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी मोहोर येतो. तुडतुडे, कोळी, मिजमाशी, पिठ्या ठेकूण इ. किडी तसेच करपा, भुरी इ. रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे आवश्यक आहे. मोहोर फुटल्यानंतर जर फवारणी केली तर किडीचे नियंत्रण करणे अवघड जाते.

1) पहिली फवारणी (पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी) –
👉डेल्टामेथ्रीन 2.8% ईसी – ९ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
👉या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते.

2) दुसरी फवारणी (बॉंगे फुटताना ) –
👉लॅम्बडा सहालोथ्रीन 5% ईसी ६ मिली आधिक हेक्साकोनॅझोल 5% ईसी १० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
👉या फवारणीमुळे रस शोषक किडी आणि भुरीरोगाचे नियंत्रण होण्यास मदत होईल.

3) तिसरी फवारणी ( दुसऱ्या फवारणी नंतर १५ दिवसांनी ) –
👉इमिडाक्लोप्रिड 17.8 % एस एल – 4 मिली आधिक कार्बेनडीझम 12% + मॅन्कोझेब 63% डब्ल्यू पी – 20 ग्रॅम. प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
👉या फवारणीमुळे रस शोषक किडी आणि करपा रोगाचे नियंत्रण होण्यास मदत होईल.

4)चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणी नंतर 15 दिवसांनी):
👉थायोमेथोक्साम 25% डब्ल्यू जी 5 ग्रॅम अधिक झिनेब 68% + हेक्साकोनॅझोल 4% डब्ल्यू पी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
👉या फवारणीमुळे रस शोषक किडी आणि करपा आणि भुरीरोगाचे नियंत्रण होण्यास मदत होईल.

5) पाचवी फवारणी (चौथ्या फवारणी नंतर १५ दिवसांनी):
👉व्हर्टिसिलिअम लेकानी ३० मिली अधिक प्सुडोमनास फ्लुरोसन्स ३० मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
👉या फवारणीमुळे रस शोषक किडी आणि करपा आणि भुरीरोगाचे नियंत्रण होण्यास मदत होईल.

✅ फळे साधारणपणे ज्वारीच्या आकाराची झाल्यानंतर जिब्रॅलीक ऍसीड १ ग्रॅम + ऍसिटोन ६० मिली किंवा अल्कोहोल १०० मिली + ५०० ग्राम युरिया + चिलेटेड झिंक १०० ग्रॅम + १०० लिटर पाणी.
प्रमाणे फवारण्या करून घ्याव्यात.

✅ फवारणी करताना घ्यावयाची खबरदारी:
👉 फवारणीसाठी लागणारे पाणी झाडाच्या आकारमानावर अवलंबून असते. तथापी मध्यम आकाराच्या झाडावर सुमारे 15 ते 20 लिटर पाणी पुरेसे आहे.
👉 फवारणी करताना पंपाचे नोझल फवारणीसाठीचे वापरावे.
👉 औषधे फवारणी बागेतील सर्व आंब्याच्या झाडावर करावी. वेळापत्रकात दिल्याप्रमाणे औषधाचे योग्य प्रमाण घेऊन द्रावण चांगले ढवळून फवारणी करावी.
👉 शिफरस न केलेली किटकनाशके अथवा इतर रासायनिक पदार्थ द्रावणात मिसळून फवारणी करू नये.

तुम्हाला हा व्हिडीओ 📱 आणि दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला 💁‍♂️ विसरू नका ! तसेच हा विडियो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेयर करा 👍

✅आमची इतर सोशल मीडिया पेजेस –

👉भारतअ‍ॅग्री ऍप – http://bit.ly/2ZyV2yl
👉फेसबुक हिन्दी – https://bit.ly/36KuGOe
👉फ़ेसबुक मराठी – https://bit.ly/36KuGOe
👉इंस्टाग्राम – https://bit.ly/3B9Ny8G
👉वेबसाइट – www.bharatagri.com
👉लिंक्ड इन – https://bit.ly/3TWtK0Z
👉भारतअ‍ॅग्री मराठी यूट्यूब चैनल – https://bit.ly/3Ryf3zt
👉भारतअ‍ॅग्री हिन्दी यूट्यूब चैनल – https://bit.ly/3L2cRxF

#bharatagri #agriculture #hindi #farming #bharatagrihindi #kisan #kheti #fasal

আরো দেখুন